✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

देशाला अधिक प्रभावशाली आणि शक्तीशाली बनवायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुन्हा सरकार आले पाहिजे यासाठी नव मतदारांनी आपली जबाबदारी येत्या काळात पार पाडली पाहिजे असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुडाळ येथील आयोजित नव मतदार नोंदणी व संवाद कार्यक्रमात केले.

कुडाळ येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या ठिकाणी नव मतदार नोंदणी व संवाद कार्यक्रम झाला‌ यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, संघटक मंत्री शैलेंद्र दळवी, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सावंतवाडीचे लखन राजे भोसले, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, सरचिटणीस प्रभाकर सावंत, युवा मोर्चाचे भाई सावंत, राजू राऊळ तसेच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, तालुकाध्यक्ष विनायक राणे, दादा साईल, आनंद शिरवलकर, युवा मोर्चाचे रुपेश कानडे, ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष दीपलक्ष्मी पडते तसेच नगरसेवक, नगरसेविका आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले की नव मतदारांची जबाबदारी मोठी असते कोणते सरकार या देशात असले पाहिजे हे ते ठरवतात 2035 मध्ये हा देश तरुणांचा असणार आहे त्यामुळे भविष्याच्या काळात तरुणांना चांगले दिवस आले पाहिजे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देणे आवश्यक आहे नव मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामे आणि देशाची उंचावलेली मान या संदर्भात जनतेला सांगणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे तरुणांना विविध क्षेत्रात वाव मिळत आहे असे सांगून माजी पंतप्रधान व काँग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणी नागरिकांचे सर्व अधिकार काढण्यात आले होते अशा प्रकारचे सरकार या पुढील काळात नको असे त्यांनी या कार्यक्रमात सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page