✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.
सावंतवाडी तालक्यातील ग्रामीण भागात रानगव्यांचा अर्थात गवारेड्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यांच्या कडून भातशेती व अन्य शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतानाच आता चक्क रान गव्यानी सावंतवाडी शहरातही धडक मारली आहे.सावंतवाडी शहरातील सालईवाडा परिसरात दिलीप उर्फ बंड्या सारंग यांच्या घरालगत रात्री हे रानगवे पोहोचले.कुत्रे भुंकू लागल्याने श्री. बंड्या सारंग यांनी पाहिले असता गव्यांचा मोठा कळप दिसून आला.नागरिकांना उद्भवणारा धोका लक्षात घेता वनविभागाने या गव्यांचा तातडीने लक्ष देऊन त्या गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
