नवी दिल्ली /-
‘कांद्याच्या निर्यातीवर लादलेली बंदी व त्यातून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा एक घोटाळाच मानावा लागेल, पण त्यावर सरकार बोलायला तयार नाही.कृषी विधेयक, शेतकरी आंदोलन आणि भारत बंद आंदोलनावरून शिवसेनेनं मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. देशात कांद्याचा तुटवडा भासू नये म्हणून केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदी शेतकऱ्यांवर लादली आणि या संकटांना सामोरा जाणारा शेतकरी पुरता दबून गेला.’कोरोनाचा फटका सगळ्यांनाच बसला व प्रत्येक देश त्यातून सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र केंद्र सरकारच्या मनमानी व हुकूमशाही धोरणांमुळे जनता त्रस्त झाले आहे. याच अनुषंगाने शिवसेनेने केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.