उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर मराठा समाजाने ‘ढोल बजाओ’आंदोलन..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर मराठा समाजाने ‘ढोल बजाओ’आंदोलन..

पुणे /-

मराठा समाजाला आरक्षण लागू करा नाहीतर खुर्च्या खाली करा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा, लाख मराठा, अशा घोषणा देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भिगवण रोडवरील सहयोग निवासस्थानाबाहेर मराठा समाजाने “ढोल बजाव” आंदोलन केले.

यावेळी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्यातील मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झालेला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात आंदोलनाची धग वाढत आहे.मागणी मान्य झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला.

अभिप्राय द्या..