चीनच्या लसीकरण मोहिमेला WHO चा पाठिंबा..

चीनच्या लसीकरण मोहिमेला WHO चा पाठिंबा..

चीनच्या आपात्कालीन परिस्थितीत कोरोना लशीकरण मोहिमेला जागतिक आरोग्य संघटनेने पाठिंबा दिला आहे.

जुलै महिन्यापासूनच चीन विविध गटांना ट्रायल स्वरुपात कोरोनाची लस देत आहे. दरम्यान, अनेक तज्ज्ञांची यावर टीकाही केली आहे.

माहिती : चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनचे अधिकारी झेंग झोंगवेई यांच्या माहितीनुसार, जूनमध्येच चीनने जागतिक आरोग्य संघटनेला आपली लशीची माहिती दिली होती.

सुरुवात : चीनने आपात्कालिन मंजुरीद्वारे अत्यावश्यक सेवांशी संबंधित लाखो कर्मचाऱ्यांना आणि हायरिस्क ग्रुपच्या अनेक जणांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात केली होती. सिद्ध: दरम्यान, आजवर चिनी लशीच्या फेज-३ ट्रायलचा चाचणी अहवाल आलेला नाही. या अहवालात ही लस सुरक्षित किंवा प्रभावी आहे की नाही हे सिद्ध होईल.

अभिप्राय द्या..