व्होडाफोननं जिंकला भारताविरोधातला खटला
व्होडाफोन कंपनीनं भारताविरोधातला 22,000 कोटी रुपयांच्या कर प्रकरणाचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला आहे. भारत सरकारनं व्होडाफोनवर लागू केलेलं करदायित्व हे भारत व नेदरलँड यांच्यातील गुंतवणूक कराराचा भंग करणारं, असं आंतरराष्ट्रीय लवादानं स्पष्ट केलं होत.
तदनंतर व्होडाफोन आयडियाच्या शेअरचा भाव मुंबई शेअर बाजारात 12 टक्क्यांनी वधारला व 10.20 रुपये प्रति शेअर झाला.आता भारत सरकारनं व्होडाफोनला 40.30 कोटी रुपये द्यावेत, असा आदेशही न्यायालयानं दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल व्होडाफोनच्या बाजुने होता, परंतु भारत सरकारनं कायदा संमत केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय अग्राह्य ठरला.कंपनीनं नेदरलँड व भारत यांच्यामध्ये झालेल्या कराराचा दाखला देत भारताच्या मागणीला आव्हान दिले होते. अखेर भारताच्या 22 हजार कोटी रुपयांच्या कर मागणी प्रकरणी व्होडाफोन कंपनीच्या बाजुनं निकाल लागला आहे.