वेंगुर्ला /-
वेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा झूम अँपव्दारे संपन्न झाली.यावेळी १०० टक्के सदस्यांनी सभेत सहभाग घेतला.सदर सभेस सभापती अनुश्री कांबळी,उपसभापती सिध्देश परब,सदस्य यशवंत परब,साक्षी कुबल,प्रणाली बंगे,गौरवी मडवळ,सुनिल मोरजकर,स्मिता दामले,शामसुंदर पेडणेकर,मंगेश कामत गटविकास अधिकारी उमा पाटील—घारगे, व विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीस पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदेश परब यांचे वडील सदानंद परब यांचे दु:खद निधन झाल्याबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली.
” माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही अभिनव योजना शासनाने जाहीर केली, या बददल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा अभिनंदनाचा ठराव सदस्य यशवंत परब यांनी मांडला.कोरोना काळात तालुका आरोग्य् अधिकारी व त्यांची टीम तालुक्यत कोरोनाचे चांगले काम करीत आहेत त्यांचे अभिनंदन अनुश्री कांबळी सभापती यांनी केले. खनीकर्म योजने अंतर्गत रेडी गावासाठी रुग्णवाहीका मिळावी, अशी सुचना सदस्य मंगेश कामत यांनी मांडली. पेंडुर ग्रामपंचायत घरपटटी संदर्भात मागील अनेक वेळा विषय सभेत मांडण्यात आलेला होता, परंतु सदर विषयाचे काय झाले या बाबत माजी सभापती सुनिल मोरजकर यांनी सुचना मांडली. हा विषय जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविणेत आलेला असल्याचे गट विकास अधिकारी यांनी सांगितले.
सध्या तालुकयात विज देयके भरमसाट आलेली आहेत.सदरच्या बिलामध्ये विज आकार घेणेत यावा, बाकीचे इतर आकार कमी करणेत यावेत, असा ठराव सुनिल मोरजकर यांनी मांडला. सध्या तालुकयात जोरदार अतिवृष्टी होत असून भात पिक व अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करुन शासनाकडुन नुकसान भरपाई मिळावी, अशी सुचना गौरवी मडवळ यांनी मांडली.सीआरझेड संदर्भात २८ सप्टेंबर रेाजी सुनावणी आहे.याबाबत यशवंत परब यांनी २८ सप्टेंबर रोजी हेाणा-या सुनावणी वेळी तालुक्यातील ग्रामपंचायतीकडील लाईट सुरु ठेवणे बाबत एमएसइबी यांना सुचना देणेबाबत सुचित केले.
पुरवठा विभागाकडुन दिव्यांग विकलांग यांना पुर्वी प्रमाणे रेशनींग व्दारे धान्य देण्यात यावे असा ठराव यशवंत परब यांनी मांडला. कोरोना काळात बाहेरुन व इतर जिल्हयातुन आलेले लोक हे १४ दिवस शाळेत क्वारंटाईन् राहत होते. सदरची शाळेच्या इमारतीचे लाईट बील वाढलेले आहे, त्यामुळे सदरची बीले जिल्हा परिषदेच्या स्व- उत्पन्नातुन सदरची देयके भरणेत यावीत, असा ठराव यशवंत परब यांनी मांडला.तसेच वेंगुर्ले तुळस मार्गे सावंतवाडी या मार्गावर झाडे वाकुन रस्त्यावर आलेली आहेत, त्यामुळे वाहन चालक यांना त्रास होत आहे. तरी सदरची झाडी तात्काळ कटिंगकरण्याबाबत यशवंत परब यांनी सूचना मांडली.म्हापण येथील लक्ष्मण वसंत परब यांचे घराशेजारी असलेला जिर्ण पोल तात्काळ हटवुन नविन पोल बसविणेबाबत यशवंत परब यांनी सुचित केले.१५ वा वित्त आयोग प. स. स्तर शासन निकषां प्रमाणे कामे सुचवावे असे गटविकास अधिकारी यांनी सूचित केले.