देशात ५ वर्षात प्राप्तिकर विभागाच्या ३७८७ धाडी ५८१० कोटी रुपये जप्त..

नवी दिल्ली/-

दिग्विजय सिंग यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारने सांगितले की, देशात 5 वर्षात प्राप्तिकर विभागाच्या 3787 धाडी पडल्या आहेत. यापैकी 50 टक्के प्रकरणात खटले भरण्यात आले. प्राप्तिकर विभागाला 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2022 दरम्यान फक्त 29 प्रकरणात दोष सिद्धी करता आली. याच अवधीत 18 प्रकरणात कोर्टाने निर्दोष मुक्ततेचे आदेश दिले. 31 मार्च 2022 पर्यंत 6899 प्रकरणे प्रलंबित आहेत. प्राप्तिकर विभागाने गेल्या 5 वर्षात 5810 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page