ओरोस /-

ओरोस येथील सिद्धीप्रिया बिल्डिंगच्या एक गाळ्यात ठेवलेल्या स्लॅबसाठी वापरल्या जाणाऱ्या १२५ लोखंडी प्लेट्स सात ते नऊ जुलै दरम्यान चोरीला गेल्याने सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानुसार संशयितांवर भा.द.वि कलम ३८०,४५४,४५७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना राजन आनंद सडवेलकर रा.नेरूर कुडाळ आणि साईराम मंगेश म्हाडदळकर रा. पिंगुळी ता.कुडाळ यांना अटक करण्यात आली होती. सदर आरोपींना मुख्य न्यायदंडाधिकारी ओरोस यांचे समोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज मे मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात संशयितास हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान संशयितांकडून जामीन अर्ज दाखल करण्यात आला. संशयितांच्या वतीने ॲड विवेक मांडकुलकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून दोन्ही आरोपींची १५००० रुपयांच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली. संशयितांच्या वतीने ॲड विवेक मांडकुलकर व ॲड भुवनेश प्रभुखानोलकर यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page