सावंतवाडी/-

माडखोल श्री देवी पावणाई मंदिराच्या जवळ असलेल्या नदिपात्रात अंदाजे सहा फुट मगर दिसून आली आहे. त्यामुळे परीसरातील शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण आहे. माडखोल धरण तुडूंब भरून वाहत असल्याने त्यातीलच एखादी मगर नदीपात्रात आली असावी, असा अंदाज सामाजिक कार्यकर्ते श्री. धनंजय माडखोलकर, लखन आडेलकर यांनी व्यक्त केला आहे. संबंधित प्रशासनाने दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी माडखोलकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page