मुंबई /-

राज्यात “शिंदे सरकार” आले, सेनेचे अनेक आमदार फुटून त्यांनी वेगळा गट स्थापन केला, मात्र कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिवसेना पक्षाशी, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी व सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी एकनिष्ठ असल्याचे पाहावयास मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते हेही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असून शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांनी आपल्या पक्षप्रमुखाच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे सांगत त्यांची “मातोश्री” वर भेट घेतली. शिवसेना सत्तेसाठी नसून सामाज कार्यासाठी आहे, सत्ता गेली म्हणून थांबू नका, नव्या उमेदीने कामाला लागा, ८०% समाजकारण व २०% राजकारण या बाळासाहेबांच्या शब्दाप्रमाणे वागा पक्ष तालुक्यात गावा गावात वाढवा असे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे बाबुराव धुरी म्हणाले, यावेळी खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख राजन मोर्ये, यांसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page