वनमहोत्सव सप्ताह निमित्त नगरसेविका चांदणी कांबळी यांच्याकडून कन्या शाळेत करण्यात आले वृक्षारोपण..

कुडाळ /-

आज १जुलै कृषी दिन याचे औचित्य साधून कुडाळ येथे १ते ७ जुलै वन महोत्सव सप्ताह म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त नगरसेविका चांदणी शरद कांबळी यांस कडून कुडाळ शहर येथील जिल्हा परिषद कन्या शाळा कुडाळ येथे वृक्ष देऊन वृक्षारोपण करण्यात आली. मोठ्या उत्साहाने या वृक्षारोपण कार्यक्रमात शाळेतील सर्व मुलांनी शिक्षकांनी आनंदाने सहभाग घेतला. त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका गोसावी मॅडम स्काऊट गाईड टीचर पेडणेकर मॅडम पालक संघटनेचे अध्यक्ष कुडाळकर सर आदी सर्व शिक्षिका उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page