कुडाळ /-
कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयचा 2021-22 या शैक्षणिक वर्षाच्या विविध शाखांचा निकाल नुकताच जाहीर झाला.मुंबई विद्यापीठाअंतर्गत या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. तृतीय वर्ष बीएमएस तसेच बीएएफ शाखेचा निकाल १००% टक्के लागला असून त्यात प्रथम क्रमांक मिहिर राजेश पेडणेकर या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
बीएमएस विभागात एकूण 50 मुलं परीक्षेला बसली होती त्यामध्ये प्रथम क्रमांक मिहिर राजेश पेडणेकर, द्वितीय चैत्राली महेश पोकळे आणि तृतीय सहदेव प्रकाश राणे तसेच बीएएफ विभागात 53 मुलं परीक्षेला बसली होती. बीएएफ विभागातुन प्रथम पूर्वा नित्यानंद कुडाळकर, द्वितीय नंदन काशिराम जळवी आणि तृतीय क्रमांक मानसी मनोज नार्वेकर या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे क.म.शि.प्र.मंडळाचे मा. श्री.भाईसाहेब तळेकर, मा. श्री.अनंत वैद्य, मा. श्री. सुरेश चव्हाण, मा. श्री. अरविंद शिरसाट, मा. श्री. का आ. सामंत सर आदी सर्व संस्थापदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. झोडगे, विभागप्रमुख दयानंद ठाकूर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.