कुडाळ /-
एस.के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट. पंचक्रोशी संचलित नेरुर. माडाचीवाडी हायस्कूलमध्ये विशेष कार्यामुळे चर्चेत राहिलेले प्रयोगशील शिक्षक श्री अनंत सामंत यांचा गणिततज्ञ श्री .रामभाऊ परुळेकर ,मुख्याध्यापक बाबुराव परुळेकर शैक्षणिक कार्य पुरस्कार 2022 देऊन गौरविण्यात आले. पुरस्काराचे स्वरुप शाल श्रीफळ व २१०००/रूपये असे आहे.कुडाळेश्वर ज्ञातीच्या सहयोग डोंबिवली संस्थेतर्फे करण्यात आलेल्या या सत्कारामुळे पाट शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी सर्व शिक्षक यांनी कौतुक केले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या सामंत सर यांना पुरस्कार देणारे श्री परुळकर कुटुंबीय यांनी शाळेला 25000 रुपयाची देणगी देण्याचा मानस ही व्यक्त केला आहे
