ओरोस /-
मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्य श्री.राजन चव्हाण यांचे चिरंजीव तेजस चव्हाण यांचे काही दिवांपूर्वीच निधन झाले.कै.तेजस चव्हाण हे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळात कुडाळ येथील कार्यालयात सुपरवायझर म्हणून कार्यरत होते.या दुःखत प्रसंगी आज शनिवारी भाजपचे सरचिटणीस तथा माजी खासदार डॉ.निलेश राणे,गोव्याचे खासदार तथा मंत्री श्रीपाद पाटील यांनी आज चव्हाण यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन चव्हाण कुटुंबीयांचे संत्वन केले.तसेच जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर ,आनंद शिरवकर,पत्रकार रवी गावडे,दादा साईल , जिल्हा बँक माजी अध्यक्ष श्री सतीश सावंत ,पत्रकार समिल जळवी यांनी भेटून संत्वन केले.तसेच मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार यांनी ज्येष्ठ पत्रकार राजन चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवरून मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि.वाबळे ,माजी खासदार सुरेश प्रभू ,माजी खासदार हुसेन दलवाई यांनी फोनच्या माध्यमातून ज्येष्ठ पत्रकार राजन चव्हाण यांची दुःखद प्रसंगी विचारपूस करून , श्री. राजन चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांचे सांत्वन केले.