कुडाळ /-

कुडाळ बस स्थानकावर प्रवाशांच्या गौरसोईबाबत एस. टी. महामंडळ, कुडाळ आगार व्यवस्थापक यांची भेट घेत चर्चा केली कुडाळ शहर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्याचप्रमाणे व्यापाराचे उगमस्थान आहे. या शहरात नव्याने बस स्थानक बांधण्यात आले आहे. शहरातील व्यापार हा मोठया प्रमाणावर ग्रामिण भागावर अवलंबून आहे. त्यासाठी ग्रामीण व शहरीभाग जोडण्यासाठी एस.टी. विभागावर असते. सारासार विचार करता शहराचे बसस्थानक हे प्रशस्त, सोईचे असल्यास त्याचा मोठा फायदा स्थानिक बाजारपेठेला होतो.

परंतु कुडाळ शहरात नव्याने बांधण्यात आलेले बस स्थानक वाढत्या कुडाळ शहरातील व्यापायाला अपूरे आहे. जर काही सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास त्याचा फायदा प्रवाशांना होईल.बसस्थानका ठिकाणी असलेले सुलभ शौचालय हे पूर्ण दिवस उघडे ठेवून त्याची स्वच्छतेची काळजी एस. टी. महामंडळाने घ्यावी. त्यामुळे नैसर्गिक विधीसाठी प्रवासी त्याचा योग्य प्रकारे वापर करू शकतील व आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहिल.बसच्या प्रतिक्षेत प्रवासी तासंतास उभे असतात. त्यांना उन्हाळयामध्ये उष्णतेचा व पावसाळयात पावसाच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागतो.त्यावर उपाय म्हणून स्थानका समोर सुसज्ज अशी शेड घालण्यात यावी. अनेकदा बसस्थानकामध्ये बसण्याच्या अपूऱ्या सुविधेमुळे प्रवासी खाली जमिनीवर, पायऱ्यांवर बसलेले आढळून येतात. त्यामुळे पुरेसी बैठक व्यवस्था करावी.

तसेच महिलांसाठी हिरकणी कक्ष (लहान मुलांना स्तनपाना साठी) सुरू करून याची योग्य देखभाल महामंडळाकडून घ्यावी.त्याच प्रमाणे प्रवाशांसाठी एस.टी. बसच्या वेळापत्रकाचा मोठा फलक लावण्यात यावा जेणेकरून प्रवाशांची होणारी गैरसोय दुरू होईल.सुचविलेल्या सोयी सुविधांची पूर्तता करित असताना एस.टी. महामंडळाने स्थानिक व्यापारी आणि व्यापारी संघटना यांच्याशी चर्चा करून प्रवाशांच्या सोईचा विचार करून मार्गी लावावी जेणेकरून प्रशासनाच्या निधीचा सुयोग्य विनीमय होईल यासाठी कुडाळ तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांच्या नेतृवाखाली प्रवाशांच्या गैरसोयी संदर्भात भेट घेतली यावेळी
व्यापारी संघटनेचे सचिव श्री. भुषण मठकर ,कुडाळ तालुका व्यापारी संघटना उपाध्यक्ष श्री.गोविंद सावंत , सचिव श्री. भूषण मठकर , खजिनदार श्री. नितीश म्हाडेश्वर , श्री प्रसाद शिरसाट , श्री द्वारकानाथ घुर्ये श्री राजन नाईक श्री अवधूत शिरसाट सौ अश्विनी गावडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page