You are currently viewing राजकारणासाठी नगरवाचनालयाला बदनाम करू नका नगरवाचनालय उपाध्यक्ष तथा नगराध्यक्ष समीर नलावडेंचे टीकास्त्र.

राजकारणासाठी नगरवाचनालयाला बदनाम करू नका नगरवाचनालय उपाध्यक्ष तथा नगराध्यक्ष समीर नलावडेंचे टीकास्त्र.

कणकवली /-

वाचनालय बचावसाठी काढलेला मोर्चा हा वाचकांचा नव्हता तर शिवसेनेच्या साडे अकरा लोकांचा होता. हा मोर्चा म्हणजे केवळ नौटंकी होती हे कणकवलीवासीयांना कळून चुकले आहे. कणकवली नगरवाचनालय हे वाचन संस्कृती वाढविण्यासाठी, वाचकांना समृद्ध करण्यासाठी कार्यरत आहे.त्याचा राजकारणासाठी वापर करून वाचनालयाची बदनामी करू नका, असे आवाहन नगरवाचनालय उपाध्यक्ष तथा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज केले.

नगरवाचनालयात झालेल्या पत्रकार परिषदेत नगरवाचनालयाच्या संचालिका कल्पना सावंत, समीर नलावडे बोलत होते. यावेळी वाचनालयाचे कार्यवाह हनिफ पीरखान, संचालक डी.पी तानवडे, रवींद्र मुसळे आदी उपस्थित होते.

यावेळी कल्पना सावंत म्हणाल्या, राज्यातील वाचनालयांसाठी शासनाकडून अत्यंत तुटपूंजे अनुदान येते. या अनुदानातून काही वेळा ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे मानधन देणेही शक्य नसते. त्यावेळी आम्ही आमच्या पदरचे पैसे घालून वाचनालय चालवत असतो. आमदार नीतेश राणे हे वाचनालयाचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी वाचनालयाला स्वनिधीतून पाच लाख रूपये दिले. त्यामधून वाचनालयाची काही कामे मार्गी लागली. तर वाचनालय बचावसाठी काढलेला मोर्चा हा वाचकांचा नव्हता तर शिवसेनेच्या साडे अकरा लोकांचा होता. हा मोर्चा म्हणजे केवळ नौटंकी होती हे कणकवलीवासीयांना कळून चुकले आहे. या मोर्चातील एक व्यक्ती सकाळी आमचे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्याकडे असते तर संध्याकाळी पारकरांकडे असते, असा टोला आणत नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी शिवसेनेच्या मोर्च्यावर टीकास्त्र सोडले आहे.

मेघा गांगण म्हणाल्या, नगरवाचनालय आमच्याकडे चालवायला द्या, अशी मागणी आमदार वैभव नाईक करत आहेत. मात्र पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडेच ग्रंथालय खाते आहे. त्यांनी निधी दिला तर कणकवलीच काय राज्यातील सर्वच ग्रंथालये चांगल्या प्रकारे चालू शकतील. तसेच वैभव नाईक यांनी सन २०२० मध्ये नगरवाचनालयातून तीन पुस्तके नेली आहेत ती अद्यापही त्यांनी प केलेली नाहीत. जे तीन पुस्तके सांभाळू शकत नाहीत ते वाचना काय सांभाळणार? असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

अभिप्राय द्या..