कुडाळ /-

शहरात नव्याने बांधण्यात येणाऱ्या मच्छिमार्केट इमारत बांधण्यापूर्वी नगरपंचायत येथील सर्व नगरसेवकांनी संबंधित विभागातील प्रशासन यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सोयींनीयुक्त बांधलेले वेंगुरला नगर परिषद आणि सावंतवाडी नगरपालिका यांच्या मच्छीमार्केट इमारतीची पाहणी करून त्याठिकाणी मच्छी विक्रेत्यांची चर्चा करून त्यातील त्रुटी व अडचणी दूर करून दर्जेदार वास्तू बांधावी अशा मागणीचे निवेदन उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांच्याकडे देण्यात आले. यावेळी कुडाळ शहराध्यक्ष राकेश कांदे, महिला शहराध्यक्ष सौ ममता धुरी, नगरसेविका सौ प्राजक्ता शिरवलकर, नगरसेवक निलेश परब, एँड. राजीव कुडाळकर ,शक्ती केंद्रप्रमुख राकेश नेमळेकर ,उपाध्यक्ष सतीश कुडाळकर ,महीला उपाध्यक्ष मुक्ती परब, बिजेन्‍द्र यादव,योगेश राऊळ, रेवती राणे, रतिकांत खांडेकर ,बाळा कुडाळकर ,श्री गुरव यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते ,यावेळी कुडाळ ग्रामपंचायत कालावधीतील बांधण्यात आलेली गळती लागलेली इमारत ,कुडाळ बस स्थानकाला उद्घाटनापूर्वी भिंतीला पडलेल्या तडे, त्यानंतर खूप आंदोलन करून बांधण्यात आलेली तुटपुंजी प्रवासी शेड ,गेली दोन वर्ष डांबरीकरण न झाल्याने चिखलाचं पाणी साचलेलं साम्राज्य ,त्याचबरोबर कोट्यवधी रुपये खर्चून कुडाळ भंगसाळ नदी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याला लागलेली गळती ,नाट्यगृहातील त्रुटी, आणि शासकीय निधीचा अर्थात जनतेच्या पैशाचा चुराडा, अशी परिस्थिती उद्भवू नये व शासनाच्या निधीचा योग्य विनियोग व्हावा यासाठी कुडाळ शहराच्या भवितव्याच्या दृष्टीने दर्जेदार नाविन्यपूर्ण मच्छिमार्केट निर्माण व्हावे. माजी नगराध्यक्ष श्री ओंकार तेली यांच्या कार्यकाळात कुडाळ शहरातील सेल्फी पॉइंट, सार्व. स्मशानभूमी, केळबाईवाडी स्मशानभूमी त्याचबरोबर गांधी चौक सुशोभीकरण हे नाविन्यपूर्ण काम त्यांनी हाती घेतले होते. अश्या धर्तीवर दर्जेदार कामे व्हावी यासाठी लेखी निवेदन नगरपंचायत नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना देण्यात आले हे निवेदन उपनगराध्यक्ष श्री मंदार शिरसाट आणि अधिकारी रचना कोरगावकर मॅडम यांच्या उपस्थितीत देण्यात आले .व चर्चा केली तसेच सदर मागणी भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page