You are currently viewing स्व. विजयराव नाईक यांच्या स्मृतिदिनी विविध कार्यक्रम.

स्व. विजयराव नाईक यांच्या स्मृतिदिनी विविध कार्यक्रम.

कणकवली /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ उद्योजक स्व. विजयराव नाईक यांचा सातवा स्मृतिदिन विजयराव नाईक फार्मसी कॉलेज मध्ये साजरा करण्यात आला. यावेळी विजयराव नाईक यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. विजयराव नाईक यांनी सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रांत देखील आपला ठसा उमटवला होता. असे प्रतिपादन याप्रसंगी आमदार वैभव नाईक यांनी केले.

यावेळी विजयराव नाईक फार्मसी कॉलेज मधील या वर्षाची आदर्श विद्यार्थिनी म्हणून प्रांजल घाडीगावकर हिची निवड करत तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी विजयराव नाईक फार्मसी कॉलेज चे संचालक सतीश नाईक, जिल्हा बँकेचे संचालक व नगरसेवक सुशांत नाईक, माजी नगरसेवक भूषण परूळेकर, महेश देसाई, संजय पारकर, सचिन आचरेकर, सिद्धेश राणे, फार्मसी कॉलेज चे संचालक मंदार सावंत , महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..