कुडाळ /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंद मराठा महासंघाची मुहूर्तमेढ रोवताना खरतर मला आज अभिमान वाटतोय जिल्ह्यात मराठा महासंघाच्या वतीने विविध कार्यक्रम राबविणे मराठा समाजातील तरुणांना विविध योजना या त्यांच्यापर्यंत पोहोचविणे आणि मराठा समाजाच्या उन्नतीसाठी नेहमी प्रयत्न करणे हे मराठा संघाचे काम राहील. हा मराठा महासंघ कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता पुढच्या काळात काम करणार आहे. आणि म्हणूनच या मराठा महासंघाची जिल्ह्यातील मुहूर्त मेढा रोवताना सर्व राजकीय पक्षांना तसेच सर्व घटकांना न्याय देण्याचे काम आम्ही केलेला आहे. मराठा महासंघाच्या काम विविध संघटनाच्या माध्यमातून होतच आहे. मात्र या संघटनांना सोबत घेऊनच पुढच्या काळात आमचं काम राहणार आहे.असे पत्रकार परिषदेत हिंद मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विशाल परब यांनी केले.कुडाळ येथील हाॅटेल लेमन ग्रास येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळेस त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी घोषित केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा कार्यकारिणीची पहिला कार्यकारणी सभा हाॅटेल लेमन ग्रास येथे अध्यक्ष विशाल परब यांच्या उपस्थितीत झाली. यावेळेस बोलताना जिल्हाध्यक्ष विशाल परब म्हणाले की,काम करत असताना आज मराठा समाजातील अनेक तरुण बेरोजगार आहेत या हातांना काम देण्याचे काम तसेच मराठा समाजाच्या लोकांसाठी ज्या योजना आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम आमच्या माध्यमातून होणार आहे. तसेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना अनेक अडचणी येत असतात या तरुणांना आर्थिक मदत मिळवून देणे तसेच अनेक विविध कार्यक्रम राबवून मराठा समाज अधिक प्रगल्भ अधिक सदृढ करण्याचे काम आम्ही पुढच्या काळात करणार आहोत. मराठा महासंघ कासाठी सतत कार्य करणे,मराठा समाजात तरुण तरुणीना विविध कामात मदत,वर्षभरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवणे,मराठा समाजातील मुला मुलींना शिक्षणासाठी मोफत वह्या पुस्तकांचे वाटप,मराठा समाजातील तरुण तरुण व युवकावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देणे, मराठा समाज वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करणे,मराठा समाजाच्या उन्नतीसाठी झटणे,मराठा समाजातील लोकांसाठी तालुकावार मेळावे आयोजित करणे,रोजगार मेळाव्याचे आयोजन करणे,जिल्हा मेळाव्याचे आयोजन करणे अशी अनेक उद्दिष्टे असल्याचे विशाल परब यांनी सांगितले.सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी खालील प्रमाणे-अध्यक्ष-विशाल प्रभाकर परब,उपाध्यक्ष-विलास गावडे ,उपाध्यक्ष-अॅड.हर्षद गावडे,सचिव-दादा साहिल, सहसचिव-शेखर सावंत,खजिनदार-प्रसाद गावडे,जिल्हा सरचिटणीस- विठ्ठल भिवा सावंत ,सदस्य*
राजू राऊळ- कुडाळ,बाबुराव धुरी- दोडामार्ग,अमित परब-सावंतवाडी,भाई राणे- सुकळवाड(मालवण),प्रदीप रावराणे-वैभववाडी,बाळू देसाई-वेंगुर्ले,मिलिंद साटम- देवगड,प्रवक्ते
रामनाथ बावकर,प्रकाश मोर्ये,सल्लागार-अशोक सावंत,प्रभाकर परब,प्रभाकर सावंत,विकास सावंत,संजू परब,एम.के.गावडे अशी असणार आहे. जून महिन्यामध्ये लवकरच कुडाळ तालुक्यांमध्ये खासदार उदयनराजे यांच्या उपस्थितीमध्ये हिंद मराठा समाजाच्या वतीने भव्य मेळावा घेणार असल्याची घोषणा यानिमित्ताने विशाल परब यांनी केली.

यावेळी मराठा समाजाचे विशाल परब,दादा साहिल,विकास सावंत,एम.के गावडे,प्रसाद गावडे,शेखर सावंत,रामनाथ बावकर,राजू राऊळ,प्रदीप रावराणे,मोहन सावंत आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page