कुडाळ /-


एस्. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी पाटची २०२२ ते २०२५ या कालावधीसाठी नूतन संचालक मंडळाची निवडणूक काल दि. २९ मे २०२२ रोजी झाली. विद्यमान संचालक पुरस्कृत डाँ. विलास देसाई यांच्या नेतृत्वाखालील पँनलने भरघोस मतांनी विजय संपादन केला.

दि. ९ एप्रिल २०२२ रोजी जाहीर झालेल्या अधिसूचना प्रमाणे निवडणूक प्रक्रिया सुरू झाली व दि. २९ मे २०२२ रोजी सायंकाळी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये निवडणूक निर्णय जाहीर करून सभेची मंजुरी घेण्यात आली. २०१३ नंतर ९ वर्षांनी निवडणूक घेण्यात आल्यामुळे सभासदांमध्ये औत्सुक्य निर्माण झाले होते.
निवडणूक निकाल खालील प्रमाणे..अध्यक्षपदी डाँ. विलास रामकृष्ण देसाई यांची झाली. श्री देसाई यांना 1113 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी विजय दामोदर ठाकूर याःना 119 मते मिळाली.
ऊपाध्यक्ष दिंगबर अच्युत सामंत ( विजयी 1114) तर प्रभाकर रामा परब ( 113 ), हिशेब तपासणीसपदी गणपत अनंत ऊर्फ दशरथ नार्वेकर यांची बिनवीरोध निवड झाली.
कार्यकारणी सदस्य …पाट ….समाधान शंकर परब ( विजयी 1110 ). दिपक प्रभाकर पाटकर ( विजयी 1110 ). राजेश विद्याधर सामंत ( विजयी 1126 ). पुंडलीक रामचंद्र पेडणेकर ( 123 ). विलास यशवंत वेगुर्लेकर (122). प्रविण अंकुश गवाणकर ( 95)
म्हापण सुधीर गोविंद ठाकूर ( विजयी 1110). नारायण केशव ऊर्फ बाबा तळावडेकर ( विजयी 1107). संजय पूरुषोत्तम ठाकूर ( विजयी 1108). विजय दामोदर ठाकूर (111). मधुकर रामचंद्र गावडे (117). चंद्रशेखर मुरारी तेली (116)
कोचरा देवदत्त सहदेव ऊर्फ दत्ता साळगांवकर (विजयी 1104). अवधूत सुभाष रेगे ( विजयी 1124). सुभाष गणेश चौधरी ( विजयी 1113).विजय यशवंत कुडव (119). अनंत शशिकांत गावडे (121) असा निकाल जाहीर करण्यात .
मुंबई सहाय्यक मंडळावर खालील सदस्याःची बिनविरोध निवड झाली. यात गुरुनाथ गोपाळ पाटकर , अजित गंगाधर ठाकूर, सुहास रामकृष्ण आजगांवकर, शिवराम गणपत चव्हाण, विलास लक्ष्मण पाटील, मंगेश प्रभाकर नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सःचालक मंडळाचा अभिनंदन ठराव करण्यात आला.
दरम्यानच्या गेल्या 9 वर्षाच्या कालावधीत संचालक मंडळाने अटल टिंकरिंग लॅब, एकनाथ ठाकूर कला अकादमी, डी. एल. टी. कोर्स, माड्याची वाडी येथे आय बी टी द्वारे कौशल्य विकास, २०२१ पासून कला आणि वाणिज्य महाविद्यालय सुरू, यावर्षीपासून इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा इत्यादी नवीन प्रकल्प उभे केले. महाविद्यालयासाठी सुमारे २ कोटी रुपये खर्चाची अद्ययावत इमारत उभी केली. माड्याची वाडी हायस्कूलमध्ये नवीन चार वर्गखोल्या, जुन्या इमारतीची दुरुस्ती, सुमारे १२०० चौरस फुटाचा प्रशस्त हॉल आणि पाट व माड्याची वाडी येथे विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ टॉयलेट उभारले. पाणी शुद्धीकरण युनिट, शेतीविषयक उत्पादनाची प्रात्यक्षिके, नर्सरी, विविध कलांचे प्रशिक्षण अशी विधायक कामे केली. माड्याच्या वाडी विद्यालयला मि.पा.या. या शासकीय राज्यस्तरीय संस्थेने राज्यात प्रथम क्रमांकाचं विद्यालय म्हणून निवड केली. अशी खूप चांगली कामे केलेली असल्यामुळे दीर्घ कालावधीनंतर झालेल्या निवडणुकीमध्ये सभासदांनी विद्यमान संचालक मंडळास भरघोस पाठिंबा देऊन त्यांच्या पाठिंब्यावर उभे राहिलेले नवीन संचालक सदस्य निवडून आले.
काल संध्याकाळी साडेतीन वाजता सुरू झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभाध्यक्ष म्हणून .समाधान परब यांची निवड करून वरील सर्व शैक्षणिक प्रकल्पांची विस्तृत चर्चा करण्यात आली. मागील सभेचे इतिवृत्त मंजुरी २०१५ पासून २०२२ पर्यंतचा जमाखर्च आणि संस्थेचे वार्षिक अहवाल याना सभासदांनी बहुमताने मंजुरी दिली. सर्व मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा होऊन शैक्षणिक विकासाचे लक्ष्य सतत ठेवण्याच्या सूचना सभासदांनी केल्या. संस्थेचे काही सन्माननीय सदस्य .विजय ठाकूर, .मधुकर गावडे, .चंद्रशेखर तेली, .गुरुनाथ मडवळ इत्यादी सदस्यांनी सूचना व प्रश्न विचारले होते. यांना संस्थेने योग्य ती उत्तरे दिली. त्यांचे पूर्ण समाधान झाले नाही तरी उपस्थित सभासदांपैकी बहुमताने सदस्यांना ही उत्तरे योग्य वाटली. संस्थेला सकारात्मक सूचना आणि ठराव देणाऱ्यांमध्ये .प्रमोद ठाकूर, .संजय पाटकर, .मंगेश कोळमकर, .सुभाष चौधरी, .दिवा बाबना परब इत्यादी सदस्यांनी सकारात्मक ठराव मांडले. सभाध्यक्षांच्या आयत्यावेळी च्या परवानगीतील काही मुद्द्यांना सभेने मंजुरी दिली आणि वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये गेली बारा वर्षे कार्याध्यक्ष म्हणून उत्तम काम केलेल्या आणि निरपेक्षपणे संचालक मंडळातून निवृत्ती घेतलेल्या रामचंद्र .रेडकर गुरुजींचा सदस्यांनी सत्कार केला. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटकर यांचाही उत्कृष्ट काम केल्याबद्दल सभासदांनी सत्कार केला. सभा अध्यक्षांनी संस्थेला आर्थिक सहाय्य करणारे कै.. बा. पाटील, विद्यमान अध्यक्ष डॉ. विलासराव देसाई, पालकमंत्री ऊदय सामंत , आमदार वैभव नाईक श्री.व सौ. अशोक सरनाईक(अमेरीका), सारस्वत बँकेचे अध्यक्ष. गौतम ठाकूर, .अरविंद पाटील, .गुरुनाथ पाटकर, .शिवराम चव्हाण, .अच्युत प्रभू .अण्णा ठाकूर , भगीरथ प्रतिष्ठानचे प्रसाद देवधर इत्यादी महानुभाव व्यक्तींचे अभिनंदन केले आणि विद्यमानसंचालक मंडळाचा अभिनंदनाचा ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेने एक मुखाने केला. सदर सभेत .अशोक तेंडोलकर, .उदय फणसेकर, डॉ. मेतर, अंकूश निवतकर, .मदन परब, .बाबना परब, .दिलीप पाटकर, सौ. स्मिता शिरपूटे, सौ. सुलक्षणा रेडकर, सौ. रेडकर, .विजय मेस्त्री, .विनया मेस्त्री, पाट हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.कोरे, माड्याचीवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.ठाकूर, महाविद्यालयचे प्रि. सौ. साळसकर, इंग्रजी मिडीयमचे श्री.तुषार आंबेरकर व संस्था सदस्य इत्यादी उपस्थित होते.सभाध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त करून श्री.विकास गवंडे आभार व्यक्त केले सभा अत्यंत सकारात्मक विचार घेऊन खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page