You are currently viewing शिवसेनेला आम.नितेश राणे यांनी वैभववाडीत दिला जोरका धक्का;माजी सभापती अंबाजी हुंबे यांचा भाजपात प्रवेश,कुर्ली पंचक्रोशीत शिवसेनेला भगदाड

शिवसेनेला आम.नितेश राणे यांनी वैभववाडीत दिला जोरका धक्का;माजी सभापती अंबाजी हुंबे यांचा भाजपात प्रवेश,कुर्ली पंचक्रोशीत शिवसेनेला भगदाड

कणकवली /-


भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षाला वैभववाडी तालुक्यात फार मोठा धक्का दिला आहे. वैभववाडी चे माजी सभापती आणि कुर्ली गावचे उपसरपंच अंबाजी हुंबे यांनी भारतीय जनता पार्टीत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत मोठ्या संख्येने पक्ष प्रेवेश केला. या पक्ष प्रवेशाने वैभववाडी तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यात शिवसेनेला खिंडार पडले आहे.हा पक्ष प्रवेश ओमगणेश निवसंस्थांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपा ची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीत प्रवेश करते वेळी आंबाजी हुंबे यांच्या सोबत गणेश शेळके, महेंद्र झोरे, दत्ताराम हुंबे,दीपक कोकरे,संदेश पवार,सचिन हुंबे,वैभव पवार,समीर चव्हाण,प्रकाश पवार,भगवान तेली,अजित हुंबे,गणेश तेली यांच्या सह असंख्ये कार्यकर्ते भाजपा मध्ये प्रवेश कर्ते झालेत.
या प्रवेशावेळी वैभववाडी भाजपा तालुका अध्यक्ष नाशिर काझी, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे,जिल्हा प्रवक्ते भालचंद्र साठे,शक्ती केंद्रप्रमुख रितेश सुतार,हुसेन लांजेकर,कुर्ली ग्रामपंचायत सदस्य सूरज तावडे,आदी उपस्थित होते.
दरम्यान पक्ष प्रवेशानंतर बोलतांना अंबाजी हुंबे म्हणाले,शहर आणि ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी राणेंच्या नेतूत्वाची गरज आहे.वैभववाडी च्या एकूणच विकासात केंद्रीय मंत्री नारायण राणे,आमदार नितेश राणे यांचे फारमोठे योगदान आहे.भविष्यात सुद्धा त्यांच्या नेतूत्वाखाली वैभववाडी च्या गावागावात विकास गंगा नेली जाईल. राणेंचे नेतूत्वच विकास करेल म्हणूनच आम्ही शिवसेना सोडली असल्याचे असल्याचे श्री हुंबे यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..