You are currently viewing कुडाळ बस स्थानक डांबरीकरणाच्या कामामुळे प्रवासी वाहतुकीत झाला बदल.;अनंत मुक्ताई हॉलच्या समोरील ग्राउंड वरून तात्पुरत्या स्वरूपात एसटी बस सेवा सुरू राहणार.

कुडाळ बस स्थानक डांबरीकरणाच्या कामामुळे प्रवासी वाहतुकीत झाला बदल.;अनंत मुक्ताई हॉलच्या समोरील ग्राउंड वरून तात्पुरत्या स्वरूपात एसटी बस सेवा सुरू राहणार.

आगार व्यवस्थापक सुजित डोंगरे यांची माहिती.

कुडाळ /-

कुडाळ बस स्थानकाच्या आवारातील डांबरीकरणाचे काम निश्चित करण्यात आले असून यासाठी दोन दिवस बस स्थानक प्रवासी वाहतुकीस बंद राहणार आहे. दरम्यानच्या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरिता शहरातील अनंत मुक्ताई हॉलच्या समोरील ग्राउंड वरून एसटी बस सेवा तात्पुरत्या स्वरूपात सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक सुजित डोंगरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

जिल्ह्यात कुडाळ शहरातील बस स्थानकाच्या पहिल्या टप्प्यातील डांबरीकरणाचे काम गुरुवार दि. २६ ते शुक्रवार दि. २७ मे २०२२ रोजी पर्यंत करण्याचे नियोजित केले असून बस स्थानकातील वाहतूक पर्यायी ठिकाणाहून करावी लागणार आहे. त्यामुळे कुडाळ शहरातील बस स्थानकातून वाहतूक पूर्णत बंद करावी लागणार आहे. तरी बस स्थानक वाहनतळ डांबरीकरणाचे काम होईपर्यंत शहरातील बस स्थानकातून जवळ असणाऱ्या अनंत मुक्ताई हॉल च्या समोरील मोकळ्या जागेचा वापर चढ-उतार करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात करण्यात येणार आहे. याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी असे राज्य परिवहन मंडळाचे कुडाळ आगार व्यवस्थापक श्री. डोंगरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

अभिप्राय द्या..