कणकवली /-

शिवसेनेचा, उद्धव ठाकरेंचा विचार घराघरात पोचवा. शिवसैनिक हा स्व. बळासाहेबांच्या कुटुंबाचा घटक आहे. शिवसेना आणि शिवसेनेचे शिलेदार समृद्ध आहेत. शिवसेना ही समाजकारणाला प्राधान्य देणारी संघटना आहे. शिवसेना काल होती आज आहे आणि उद्याही असणार आहे. ज्यांनी शिवसेना सोडली त्यांनी स्वतःचे उद्या काय होईल याची काळजी करा, असा उपरोधिक टोला शिवसेना सचिव तथा खासदार अनिल देसाई यांनी विरोधकांना लगावला.

समाजात किती शिवसैनिकांची नोंदणी केली ? किती नवमतदारांची नावनोंदणी केली ? कोव्हीड काळात जीवाची बाजी लाऊन जनतेला सेवा दिली. निराधार कुटुंबांना आधार दिला. कोरोनाच्या कठीण काळात राज्याची अर्थव्यवस्था टिकवून ठेवणारे कणखर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला लाभले आहेत. महिला आघाडीने जनसेवेत पुढाकार घ्यावा. शिवसेना सचिव तथा खासदार अनिल देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसंपर्क अभियानच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची सुरुवात कणकवली येथून झाली. कणकवली विधानसभा मतदारसंघाचा मेळावा आचरेकर प्रतिष्ठान सभागृहात संपन्न झाला. या मेळाव्याला शिसैनिकांची खचाखच गर्दी होती. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा समन्वयक बोरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, कोकण पर्यटन समिती उपाध्यक्ष संदेश पारकर, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे, स्वप्नील टेंबुलकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम पालव, कणकवली तालुका संपर्कप्रमुख शंकर पार्सेकर, कणकवली तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत, शैलेश भोगले, वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके, देवगड तालुकाप्रमुख विलास साळसकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page