आज भाजपचा पं.दीनदयाळ उपाध्याय जयंती कार्यक्रम 915 बूथवर साजरा होणार :-जिल्हा चिटणीस बंड्या सावंत

आज भाजपचा पं.दीनदयाळ उपाध्याय जयंती कार्यक्रम 915 बूथवर साजरा होणार :-जिल्हा चिटणीस बंड्या सावंत

कुडाळ /-

आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी,भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 915 सर्व बुथवर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी होणार आहे.त्यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांना पंडितजींच्या व्यक्तिमत्वाचा आणि कर्तृत्वाचा परिचय व्हावा यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी आपापल्या राहत्या ठिकाणी भाजपा चा झेंडा लावावा.जेणेकरून बूथ वरील कार्यकर्त्यांना एकात्म मानववाद (अंत्योदय) हा विचार समजेल.हा कार्यक्रम करताना सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तोंडाला मास्क व सोशल डिस्टनसिग चे काटेकोरपणे पालन करावे आणि पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती कार्यक्रम साजरा करावा असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा चिटणीस बंड्या सावंत यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..