मालवण /-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या तारकर्ली येथील समुद्रात पर्यटकांना घेऊन जाणारी बोट बुडाली. या बोटीत एकूण वीस पर्यटक होते. यातील सोळा जणांना वाचवण्यात यश आले आहे तर दोघांचा बुडून मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर अवस्थेत आहेत.