उपविभागीय पोलिस अधिकारी सावंतवाडी यांच्यामार्फत कुडाळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक व सहाय्यक निरीक्षक यांची चौकशी सुरू..

कुडाळ /-

कुडाळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक आणि सहायक निरीक्षक यांची कुडाळ शहरातील बेवारस दारू साठा घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी यांना आदेशित केले असल्याने २० मे रोजीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेने नियोजित उपोषण मागे घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे कुडाळ पोलिस ठाण्याकडून लेखी स्वरूपात सांगण्यात आल्यामुळे सदर चे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी दिली.

जिल्ह्यातील कुडाळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षक यांनी बेवारस दारू साठ्यात घोटाळा करून सुमारे २५ हजार रुपयांचा सरकारी मुद्देमाल स्वतःच्या फायद्यासाठी आपापसात वाटून घेतला होता. याबाबत पाठपुरावा करून देखील दोन्ही दोषी अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्यामुळे संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांचे निलंबन करण्यात यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी २० मे २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचे जाहीर केले होते. परंतु कुडाळ पोलिस ठाण्याच्या संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांच्या सदर प्रकरणी चौकशीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सावंतवाडी यांची नेमणूक केली असल्यामुळे सदरचे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याचे श्री. आबा खवणेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page