You are currently viewing मालवणात १३,१४,१५में ला “समर शूटिंग कैम्प”

मालवणात १३,१४,१५में ला “समर शूटिंग कैम्प”

मालवण /

मार्क्स मॅन स्पोर्ट क्लब च्या वतीने मालवण येथे दादा पवार यांच्या “रॉयल पवार “शूटिंग सेंटर मधे दिनांक १३,१४,१५में ला “समर शूटिंग कैम्प” आयोजित करण्यात आला आहे. रायफल पिस्तूल नेमबाजी प्रशिक्षणात राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय खेळाडू व या मार्गदर्शन करणार आहेत.
प्रशिक्षण केंद्रावर रायफल व एअर पिस्तूल हे दोन ऑलम्पिक क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. कोणतीही व्यक्ती या शिबिरात सहभागी होऊ शकते. शालेय स्तरावरील विदयार्थ्यांना आंतरशालेय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी या क्रीडा प्रकाराचा खूप फायदा होणार आहे. तसेच महाविद्यालय स्तरावर नेमबाजी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी देखील या शिबिराचा फायदा होईल. तरी या प्रशिक्षण केंद्राचा अधिकाधिक नेमबाजी इच्छुकांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी दादा पवार यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन मार्क्स मॅन स्पोर्टस क्लब यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..