वेंगुर्ला /-

      वेंगुर्ले तालुक्यातील श्री सातेरी प्रासादिक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी वेतोरे च्या आज रविवारी दि. ८ मे रोजी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री देवी सातेरी सहकार वैभव गाव पॅनलने श्री देवी सातेरी पंचायतन सहकार समृद्ध विकास पॅनलचा एकतर्फी पराभव करीत सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.या पॅनलचे एकूण १२ पैकी १२ ही उमेदवार विजयी झाले.तर १ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. श्री देवी सातेरी सहकार वैभव गाव पॅनल वेतोरे च्या सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी मधून अर्जुन लक्ष्मण कानडे(२८८मते), दत्ताराम गणपत नाईक(३४२ मते), महानंद मनोहर नाईक(२९६ मते), सखाराम आत्माराम नाईक(२९९मते),
सत्यवान गोविंद राऊळ(३०९मते), नारायण महादेव शेर्लेकर(३०६ मते),
उत्तम दाजी वालावलकर(३०५ मते),न्हानू लवू वराडकर(३०३ मते), महिला प्रतिनिधी मधून प्रज्ञा नारायण पायनाईक(३३६ मते), संतोषी संतोष नाईक(३४० मते), अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी मधून सुनिल न्हानू जाधव(३३७ मते), इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मधून देविदास राजाराम वेंगुर्लेकर(३३० मते) हे १२ उमेदवार निवडून आले आहेत.तर याच पॅनलचे भटक्या विमुक्त जाती जमाती प्रतिनिधी मधून समिर महादेव गोसावी हे १ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page