You are currently viewing कुडाळ शहरातील लक्ष्मीवाडी येथील श्री देव नरसिंह मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व शिखर कलशारोहन कार्यक्रम दि. १० मे ते,१४ मे दरम्यान..

कुडाळ शहरातील लक्ष्मीवाडी येथील श्री देव नरसिंह मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व शिखर कलशारोहन कार्यक्रम दि. १० मे ते,१४ मे दरम्यान..

कुडाळ /-

कुडाळ शहरातील लक्ष्मीवाडी येथील श्री देव नरसिंह मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व शिखर कलशारोहन कार्यक्रम दि. १०, ११,१२,१३ व १४ मे रोजी होणार आहे.श्री महाविष्णूचे भक्त प्रल्हादाच्या रक्षणार्थ अवतार घेतलेले भगवान श्री नरसिंह. अशा संकटकालीन धावणा-या श्री देव नरसिंहाचे दूर्मिळ मंदिर कुडाळ शहरातील लक्ष्मीवाडी येथे असून या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या मंदिरामध्ये मूर्ती पुनः प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. या निमीत्ताने मंगळवार १० मे रोजी दुपारी ३ वाजता श्रींची मूर्ती मिरवणूक निघणार आहे. बुधवार ११ मे रोजी सकाळी ७.३० वाजता धार्मिक कार्यक्रम, दुपारी १.३९ वाजता शिखर कलश प्रतिष्ठा, नैवेद्य प्रसाद, सायंकाळी ५ वाजता उमळकर प्रासादिक भजन मंडळाचे भजन सायंकाळी ६ वाजता नरसिंह भजन मंडळाचे भजन, सायंकाळी ७ वाजता भैरव जोगेश्वरी महिला मंडळाचा फुगडी कार्यक्रम, सायंकाळी ८ वाजता सरंबळ येथील श्री सातेरी देवी बालग्रुप मंडळ यांचे समई नृत्य, रात्री ९ वाजता अमृतनाथ दशावतार मंडळ यांचे ट्रीकसीन युक्त पौराणिक नाटक माझे माहेर पंढरी, गुरुवार १२ मे रोजी सकाळी ७.३० वाजता धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी ५ वाजता तुळस मातोंड येथील सद्गुरु भजन मंडळाचे भजन, सायंकाळी ६ वाजता ओंकार मेस्त्री यांचे पखवाज सोलोवादन, सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. श्री भाऊ नाईक यांचे कीर्तन, रात्री ९ वाजता आजगावकर दशावतार मंडळाचे पौराणिक नाटक गणेश नागिन युद्ध, शुक्रवार १३ मे रोजी सकाळी ७.३० वाजता धार्मिक कार्यक्रम, सकाळी ८.०६ वाजता मूर्ती प्रतिष्ठापना, सकाळी १० वाजता धार्मिक कार्यक्रम, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता तिवरे येथील सौभाग्य लक्ष्मी सोनू संगीत साधना प्रसादिक भजन मंडळाचे भजन, सायंकाळी ६.३० वाजता कडावल येथील श्री स्वामी समर्थ भजन मंडळाचे भजन, सायंकाळी ७.३० वाजता ह. भ‌. प. रामचंद्र मेस्त्री यांचे कीर्तन, रात्री ९ वाजता वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ नाटक, शनिवार १४ मे रोजी श्री नरसिंह जयंती उत्सवानिमित्त सकाळी ७ वाजता धार्मिक कार्यक्रम, सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ४ वाजता ह.भ.प. श्री राजू मुंडले यांचे कीर्तन, सायंकाळी ६.३० वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा, रात्री ९ वाजता खानोलकर दशावतार नाट्य मंडळाचे पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे तरी सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नरसिंह मंदिर मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..