You are currently viewing झाराप मधे “रंगला खेळ पैठणीचा” अन्वी हरमलकर ठरल्या प्रथम क्रमांकच्या मानकरी..

झाराप मधे “रंगला खेळ पैठणीचा” अन्वी हरमलकर ठरल्या प्रथम क्रमांकच्या मानकरी..

कुडाळ /-

झाराप येथील श्री भावई च्या प्राणप्रतिष्ठापना सोहळया निमित्तआजआयोजित ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमात महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. दिलेला टास्क पूर्ण करणे अन् सोबतीला संगीताचा ठेका अशा उत्साहात स्पर्धा रंगली. समस्त झारापवासीय मोठ्या संख्ये ने उपस्थित होते.

झाराप ग्रामस्थ, आणि साळगाव हायस्कूल चे शिक्षक यांनी हा खेळ. पुरस्कृत केला होता. ५०महिला स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. उखाणे, रिंग, चेंडू फेकणे, लंगडी, धागा वेचणे अशा वेगवेगळ्या स्पर्धामध्ये शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्यासाठी प्रत्येक स्पर्धकांची उडालेली धांदल अन् उत्साह स्पर्धेमध्ये रंगत वाढविणारा ठरला. सोबतीला संगीताचा ठेका अन् उत्साह यामुळे स्पर्धा उत्तरोत्तर रंगतदार ठरली. ४०वर्षांपासून चे स्पर्धक स्पर्धेत होत्या. स्पर्धेत प्रथम अन्वी अमित हरमलकर, द्वतिय प्रतीक्षा संतोष शिरोडकर, तृतीय महादेवी दत्तगुरु भगता हे पैठणी चे मानकरी ठरले आहेत. शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्यांना विजेते घोषित करण्यात आले. विजेत्यांचा पैठणी देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थानी सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा