You are currently viewing वेंगुर्ले – वजराट येथील मुलीचा  झोपाळ्यावरुन पडल्याने मृत्यू

वेंगुर्ले – वजराट येथील मुलीचा  झोपाळ्यावरुन पडल्याने मृत्यू

वेंगुर्ला /-

वजराट परबवाडी येथील रहिवासी व वजराट जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा नं.१ ची विद्यार्थिनी कु. कार्तिकी शेखर परब (वय ११) हिचा राहत्या घरी झोपाळ्यावरुन पडल्याने मृत्यू झाला. ही घटना काल गुरुवारी सायंकाळी ५.३० वा.सुमारास घडली. कार्तिकी शेखर परब ही काल गुरुवारी ५ मे रोजी सायंकाळी ५.३० वा.सुमारास राहत्या घरी झोपाळ्यावरुन पडल्याने तिला उपचारासाठी वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. याबाबतची खबर राजेंद्र संभाजी परब यांनी वेंगुर्ले पोलिसांत दिली.याबाबत वेंगुर्ले पोलिसांत आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार डी. बी.पालकर हे करीत आहेत.तिच्या पश्चात आई, वडील,लहान भाऊ,आजी,आते, काका, काकी असा मोठा परिवार आहे.शेतकरी कुटुंबातील असलेल्या कार्तिकी हिच्या बाबतीत घडलेल्या या दुर्दैवी घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून तालुक्यासह वजराट गावातून हळहळ व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा