You are currently viewing दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग मनसंतोष गड ट्रेकिंग साहित्य अनावरण कार्यक्रम संपन्न

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग मनसंतोष गड ट्रेकिंग साहित्य अनावरण कार्यक्रम संपन्न

कुडाळ /-

आज शुक्रवार दिनांक ६ मे २०२२ रोजी दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागाला मनसंतोष गड ट्रेकिंग उपक्रम अंतर्गत अनेक दात्यांकडून देणगी स्वरूपात मिळालेल्या ट्रेकिंग साहित्याच्या अनावरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. शिरशिंगे गोठवेवाडी येथील गोठेश्वर मंदिराच्या सभामंडपात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर उपक्रमासाठी भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झाराप व रोटरी क्लब ऑफ कुडाळ ने प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांची मदत केली. तसेच इतर दात्यांनी सदर उपक्रमास १००₹ पासून ५०००₹ पर्यंत मदत केली. या जमलेल्या निधीमधून मनसंतोष गड ट्रेकिंग साठी लागणारे साहित्य खरेदी करण्यात आले. या साहित्याच्या माध्यमातून मनसंतोष गडावर जाण्यास इच्छुक दुर्ग प्रेमींना सुरक्षित गडावर नेणे व आणणे कार्यक्रम तसेच शिरशिंगे व शिवापूर भागातील शालेय विद्यार्थ्यांना गिर्यारोहणाची आवड निर्माण व्हावी यासाठी विविध शिबीरे आयोजित केली जाणार आहेत. मनसंतोष गड ट्रेकिंग उपक्रमातून स्थानिकांना रोजगार निर्मिती होणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या ओळखी नंतर दीपप्रज्वलन, गोठेश्वर देवाला तसेच शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हार अर्पण करून झाली. उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्या नंतर दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागचे अध्यक्ष गणेश नाईक यांनी कार्यक्रमाचे प्रस्थाविक केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांपैकी रोटरी क्लब ऑफ कुडाळचे माजी अध्यक्ष श्री गजानन कांदळगावकर, रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष अभिषेक माने, शिरशिंगे ग्रामपंचायत उपसरपंच श्री पांडुरंग राऊळ, शिरशिंगे माजी सरपंच श्री सुरेश शिर्के, कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ प्रसाद देवधर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर ट्रेकिंग साहित्याचे अनावरण करण्यात आले. या अनावरण कार्यक्रमासाठी भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रसाद देवधर, रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष अभिषेक माने, रोटरी क्लब ऑफ कुडाळचे माजी अध्यक्ष गजानन कांदळगावकर, प्रमोद भोगटे, सचिन मदने, असिस्टंट गव्हर्नर इलेक्ट नीता गोवेकर, जामसंडेकर, शिरशिंगे सरपंच रेखा घावरे, उपसरपंच पांडुरंग राऊळ, फौजदार वसंत शिर्के, शिवापूर गावचे सामाजिक कार्यकर्ते वकील सुधीर राऊळ, माजी सरपंच सुरेश शिर्के, दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग अध्यक्ष गणेश नाईक, दुर्ग मावळा प्रतिष्ठान जिल्हा अध्यक्ष प्रसाद सुतार, कोकण विभाग सामाजिक उपक्रम विभाग प्रमुख समीर धोंड, कोकण विभाग सरचिटणीस सुनिल करडे, सिंधुदुर्ग महिला अध्यक्ष सोनाली परूळेकर, सिंधुदुर्ग कार्याध्यक्ष पंकज गावडे, मनोहर गड संवर्धन प्रमुख रोहन राऊळ, मनसंतोष गड संवर्धन प्रमुख नितेश गावडे, सावंतवाडी तालुका सरचिटणीस सच्चीदानंद राऊळ, विशाल परब, सुहास सावंत, आनंद मेस्त्री, अजित कडव, गोठवेवाडी गडकरी बांधव, शिरशिंगे ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुनिल करडे व आभार प्रदर्शन गणेश नाईक यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन समीर धोंड, नितेश घावरे, प्रसाद सुतार व सोनाली परुळेकर, रोहन राऊळ यांनी केले.

अभिप्राय द्या..