You are currently viewing देवळातील फंडपेटी फोडून रक्कम चोरल्याच्या गुन्हयातून आरोपीची निर्दोष मुक्तता संशयित आरोपी तर्फे अॅड भुवनेश प्रभुखानोलकर यांनी काम पाहिले.

देवळातील फंडपेटी फोडून रक्कम चोरल्याच्या गुन्हयातून आरोपीची निर्दोष मुक्तता संशयित आरोपी तर्फे अॅड भुवनेश प्रभुखानोलकर यांनी काम पाहिले.

कुडाळ /-

नेरूर कुडगळवाडी येथील श्री देवी तुळजाभवानी मंदिर, नेरूर ठाकूरवाडी येथील श्री देव चौकुर्ण मंदिर तसेच मांडकुली येथील श्री देव लिंगेश्वर मंदिर या मंदिरातील दरवाजांचा कोयंडा व कुलूप तोडून गाभा-यातील फंड पेटीतील रक्कम अज्ञात इसमाने चोरून नेल्याची फिर्याद श्री सुभाष नाईक यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात दिली होती. या बाबत तपास सुरू असताना, पोलिसांनी संशयित आरोपी सतीश मुरलीधर झाजम रा. तळेबाजार, देवगड याला अटक करून त्याचे विरुद्ध मे. कुडाळ न्यायालयात भा. दं. वि. कलम ४५४, ४५७, ३८० या गुन्ह्याखाली दोषारोप पत्र दाखल केले होते. या कामी सरकार पक्षाने एकूण पाच साक्षीदार तपासले होते. मात्र साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती व संशयित आरोपीतर्फे अॅड भुवनेश प्रभुखानोलकर यांनी केलेला युक्तिवाद विचारात घेऊन मे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कुडाळ यांनी संशयित आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. संशयित आरोपीतर्फे अॅड भुवनेश प्रभुखानोलकर तसेच अॅड कन्हैया निवतकर यांनी काम पाहिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा