You are currently viewing राज्यात पुन्हा मास्कसक्ती होण्याची शक्यता.;राज्य टास्क फोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली शिफारस.

राज्यात पुन्हा मास्कसक्ती होण्याची शक्यता.;राज्य टास्क फोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली शिफारस.

मुंबई /-

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत असून, या पार्श्वभूमीवर राज्यात बंदिस्त ठिकाणी (इनडोअर) मास्क वापराची सक्ती करण्याचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. तशी शिफारस राज्य टास्क फोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

तसेच लसीकरण मोठ्या प्रमाणात वाढविण्याच्या गरजेवर भर दिला आहे. दिल्ली, कर्नाटक तसेच इतर काही राज्यांमध्ये कोविड संसर्गात वाढ होत असून, त्याविषयी महाराष्ट्रातील राज्य टास्क फोर्सने चिंता व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी टास्क फोर्सची सोमवारी रात्री बैठक घेतली. तेव्हा ही चिंता त्यांच्या कानावर घालण्यात आली. मास्कचा वापर वाढविणे, लसीकरणाला आणखी वेग देणे, रुग्णांचा शोध घेणे, जिनोम सिक्वेन्सिंगवर भर देणे आवश्यक आहे, असे टास्क फोर्सने सांगितले.

अभिप्राय द्या..