You are currently viewing नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांबाबत युवासेना आक्रमक.;युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट.

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांबाबत युवासेना आक्रमक.;युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट.

सिंधुदुर्गनगरी /-

नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रिया परीक्षेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हयातील जि. प. च्या ५ वीच्या विद्यार्थ्यावर सातत्याने अन्याय होत आहे. यासंदर्भात शिवसेना पदाधिकारी सुजित जाधव यांच्या माध्यमातून गेले काही दिवस सातत्याने आवाज उठवण्यात येत आहे. शिवसेनेने हा विषय हाती घेतला आणि सिंधुदुर्गातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या संदर्भात गांभीयनि लक्ष घालून कारवाईची मागणी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक. नगरसेवक कन्हैया पारकर व उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सुजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा प्रश्न युवासेनेने उचलून धरला असून, वेळीच कारवाई झाली नाही तर युवासेना याप्रश्नी आक्रमक होणार आहे. संबंधित प्रकाराची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अन्यथा सिंधुदुर्ग जिल्ह्यात युवासेना आक्रमक स्वरूपात आंदोलन उभारू असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. या संपूर्ण प्रकरणी मी स्वतः जातीनिशी लक्ष घालून चौकशीअंती कारवाई करेन असे आश्वासन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले. तसेच त्यांनी या प्रश्नी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे नाईक यांनी यावेळी सांगितले. त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तालुका नुसार पडतळणी केली असता नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रियेत सावंतवाडी ८५ कणकवली ३४ वैभववाडी – २३. मालवण १८. दोडामार्ग ८, कुडाळ ४, वेंगुर्ला तालुका ३६, देवगड १ विद्यार्थी परजिल्हय़ातील फक्त नवोदय विद्यालयाच्या परीक्षेच्या उद्देशाने फक्त ५ वी मध्ये प्रवेश घेतलेले आहेत. त्यामुळे साशंकता निर्माण झाली आहे. सिंधुदुर्ग जि.प. विद्यार्थ्यांना सांगेली येथील नवोदय विद्यालय हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात असूनही आणि विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असूनही सातत्याने केवळ चुकीच्या पद्धतीने कार्यपद्धती राबवली जात असल्याने काही प्रशालामध्ये जिल्हयाबाहेरील…

अभिप्राय द्या..