You are currently viewing मुणगे देवस्थान अध्यक्षपदी ओंकार पाध्ये यांची निवड..

मुणगे देवस्थान अध्यक्षपदी ओंकार पाध्ये यांची निवड..

देवगड /-

नवसाला पावणाऱ्या व भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती देवालयाच्या श्री भगवती देवस्थान कमिटीच्य अध्यक्षपदी ओंकार पाध्ये, तर उपाध्यक्षपदी दिलीप दिगंबर महाजन, सचिवपदी निशाद परुळेकर यांची निवड झाली आहे. विश्वस्त म्हणून प्रकाश सावंत, आनंद घाडी, पुरुषोत्तम तेली, मनोहर मुणगेकर, अनिल धुवाळी, कृष्णा सावंत, रामचंद्र मुणगेकर, वसंत शेट्ये हे काम पाहणार आहेत. देवस्थान कमिटीच्या माध्यमातून विविध धार्मिक व लोकोपयोगी उपक्रम यापुढेही राबविण्यात येतील असे अध्यक्ष ओंकार पाध्ये म्हणाले.

अभिप्राय द्या..