You are currently viewing महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने.;महिलांसाठी काथ्या मशीन  उपलब्ध..

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने.;महिलांसाठी काथ्या मशीन उपलब्ध..

परुळे /-

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्ताने परुळे गौतमनगर येथील महिलांसाठी बौद्ध प्रगतीसंघ परुळे मुंबई व श्री सिद्धार्थ जाधव यांच्या व सहकाऱ्यांच्या लोकवर्गणीतुन व ग्रामपंचयात परुळेबाजार सहकार्याने परुळेगौतमनगर येथील महिलांसाठी काथ्या मशीन उपलबध करून देण्यात आल्या आहेत त्याचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले यावेळी परुळेबाजार सरपंच श्वेता चव्हाण उपसरपंच मनीषा नेवाळकर सदस्य सुनील चव्हाण तसेच सिद्धार्थ जाधव सुहास परुळेकर जनार्दन परुळेकर परशुराम चव्हाण प्रेमा जाधव श्रद्धा जाधव सुषमा वराडकर सुमित्रा परुळेकर सौ देऊलकर यासह महिला उपस्थित होत्या यावेळी परुळेबाजार ग्रामपंचायत व बौद्ध प्रगती संघ परुळे यांच्यासंयुक्त विध्यमाने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी समाजबांधवांनी एकत्र येत रैली काढली व ग्रामपंचायत कार्यलाय येथे जयंती निमिताने महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले यावेळी ग्रामसेवक शरद शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले तसेच यावेळी श्री सिद्धार्थ जाधव यांचे ग्रामपांचायतच्या वतिने सन्मान करण्यात आला .

प्रतिक्रिया व्यक्त करा