You are currently viewing फोंडाघाटच्या सदानंद पारकर यांनी ११४ दिवसांत ३५०० किलोमीटरचा ” नर्मदा परिक्रमा ” प्रवास केला पायी पूर्ण..

फोंडाघाटच्या सदानंद पारकर यांनी ११४ दिवसांत ३५०० किलोमीटरचा ” नर्मदा परिक्रमा ” प्रवास केला पायी पूर्ण..

कणकवली/-

कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील श्री.सदानंद शंकर पारकर वय वर्षे (६३) जेष्ठ नागरिक यांनी १ डिसेंबर २०२१ ते २४ मार्च २०२२ रोजी अशी ११४ दिवस व ३५०० कि.मी.चा प्रवास करत नर्मदा परिक्रमा पूर्ण केली, नर्मदेच्या काठावरून एकट्याने ही परिक्रमा करताना त्यांनी ५९२ गावे पार केली.परिक्रमा पूर्ण करून फोंडाघाटमध्ये परतलेल्या सदानंद पारकर यांच्या शिवसेना पदाधिकारी व फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचालक यांनी त्यांच्या घरी जावून सत्कार केला.

नर्मदा परिक्रमा म्हणजे काय?

भारतातील सर्व मोठ्या नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात,परंतु नर्मदा नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते.नर्मदा नदीचा काठ म्हणजे जणू तापोभूमी.तिच्या काठावर ऋषीमुनी, साधू संतांनी तपश्चर्या केल्याची तर काही साधूंनी नर्मदेत जिवंत जलसमाधी घेतल्याची उदाहरणे पुराणकथांमधून मिळतात. नर्मदा जयंतीला सर्व नद्या या नदीमध्ये अंघोळीला येतात व शुद्ध होऊन जातात असे पुराणात म्हटले आहे. या नदीचा उगम अमरकंठक मध्यप्रदेश येथे झालेला असून ती मध्यप्रदेश, गुजरात,महाराष्ट्र (नंदूरबार जिल्हा) या तीन राज्यांतून वाहते.

श्री. पारकरे हे कुडाळ कविलगाव येथील देशातील पहिल्या शिर्डी मंदिरात दरवर्षी गुरुपौर्णिमेला कणकवली ते कुडाळ पायी वारी करतात.त्यातूनच त्यांना नर्मदा परिक्रमेची प्रेरणा मिळाली. गुगलवरून या परिक्रमेची माहिती घेतली.दरम्यान यापूर्वी ही परिक्रमा पूर्ण करणारे..कणकवलीतील सुजन कामत यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.परिक्रमे दरम्यान वाटेत गावातील नागरिक किंवा आश्रम मंदिर येथे जेवणाची व राहण्याची व्यवस्था होत होती.या परिक्रमेसाठी आपल्याला पत्नीची मोठी साथ लाभल्याचे ते सांगतात.परिक्रमेची सुरुवात पहाटे यापूर्वी त्यांनी पायी बाळूमामा ५ वा व्हायची.त्यानंतर नर्मदेचे पूजन करून सकाळी ६ वा. पाठीवर ८ किलोची बॅग, एक कमंडलु,एक दंड घेऊन मार्गस्थ व्हायचे ते संध्याकाळी सायंकाळी ६ वा.पर्यंत अशी दररोज १२ तासांची अखंड पायपीट त्यांनी केली.ही वारी, पंढरपूर आषाढी, माघ वारी तसेच ठाणे – वर्तकनगर ते शिर्डी अशा पायी वाया केल्या आहेत.पारकर हे कणकवली खरेदी विक्री संघाचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत.

अभिप्राय द्या..