जलसंपदा विभागमध्ये
सहाय्यक अभियंता (Gazetted officer) पदावर नियुक्ती.

दोडामार्ग /-

दोडामार्ग तालुक्यातील शिरंगे येथील अनिकेत अंकुश गवस याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग
परीक्षेत यश मिळवले आहे. नुकत्याच जाहिर झालेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०१९ यामध्ये महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागमध्ये
सहाय्यक अभियंता श्रेणी -२ (Gazetted officer) या पदावर त्याची नियुक्ती झाली आहे. महत्वाचे म्हणजे कोणतेही मोठे क्लासेस न लावता केवळ अभ्यासिकेत राहून त्याने स्व अध्ययनातून हे यश प्राप्त केले आहे.

अनिकेतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल भेडशी,
अभियांत्रिकी शिक्षण डॉ.B.R.Ambedkar tech. Univ. Raigad ( civil engineering) येथून झाले लहानपणापासून अभ्यासू वृत्ती ठेवत आणि आई अंगणवाडी सेविका असल्याने शिक्षण म्हणजे काय असते हे अगदी कमी वयातच समजले असता स्वतः अभ्यास बद्दल मनात एकाग्रता निर्माण करत जिद्दीने कोणतेही क्लासेस न करता अनिकेत नेहे यश संपादन केले असून पहिली ते दहावीपर्यंत पहिला क्रमांक पटकावत दहावीत ९६ % मार्क मिळवत नंतर पुढील शिक्षण बारावी पर्यंत S.P.K कॉलेज मध्ये पूर्ण केले असता त्याचे वडील अंकुश लक्ष्मण गवस (सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक , जलसंपदा विभाग)
आई- सौ.अंकिता अंकुश गवस अंगणवाडी सेविका असा परिवार आहे. दोडामार्ग तालुक्यातील या युवकाने मिळविलेल्या यशाबद्दल सर्वच स्तरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page