कुडाळ /-

कुडाळ तालुक्यामधील आकेरी गावातील ग्रामस्थाला सरपंच महेश गंगाराम जामदार यांनी बेदम मारहाण केल्याची घटना काल घडली आहे. आकेरी गावातील सदाशिव संजय माने यांनी गावातील पाणीप्रश्नी आवाज उठविला. या कारणावरून आकेरी गावचे सरपंच महेश जामदार यांनी सदाशिव माने यांना शिविगाळ करून मारहाण केली. यावेळी घटनास्थळी आकेरी गावचे ग्रामसेवक राजेश निवतकर हे सुद्धा उपस्थित होते. ग्रामसेवकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. या प्रकरणी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी आवाज उठविला असून आकेरी गावचे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी पूर्वनियोजित कट रचून सावंतवाडीवरून घरी जाणाऱ्या माने यांना अडवून शिवीगाळ आणि मारहाण केली असा आरोप धीरज परब यांनी केला. तसेच याबाबत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर निलंबन कारवाई व्हावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात येईल, असे मनसे अध्यक्ष धीरज परब यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी घटना घडल्यावर ग्रामस्थांनी धीरज परब यांची भेट घेवुन हकीकत सांगीतली ,परब यांनी ग्रामस्थ समवेत जावुन सावंतवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
प्रकरणी मिडीयाशी बोलताना परब म्हणाले आमदार, पालकमंत्री, खासदार यांच्या जीवावर सेनेचे लोकप्रतिनिधीं उन्मत्त झाले आहेत. सत्तेचा माज यांना आला आहे. मायबाप जनतेला मारहाण करुन दमदाटी करणे ही नित्यांची कामे झाली आहेत. साध्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न उपस्थित केला तर सरपंच दमदाटी ,मारामारी, आणि ग्रामपंचायतची कागद पत्रे देणार नाही म्हणून धमकवतात.. परंतु अशा अन्याय ग्रस्थ लोकांच्या पाठीशी आम्ही भक्कम पणे उभे आहोत. दादागीरी चालु देणार नाही. लोकांनी पुढे येवुन तक्रारी कराव्यात असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page