You are currently viewing राष्ट्रवादीचे प्रसाद रेगे यांनी टायर जाळत रोखला कुडाळ येथे मुंबई गोवा महामार्ग.;रेगे व पोलिस यांच्यात शाब्दिक बाचाबाची..

राष्ट्रवादीचे प्रसाद रेगे यांनी टायर जाळत रोखला कुडाळ येथे मुंबई गोवा महामार्ग.;रेगे व पोलिस यांच्यात शाब्दिक बाचाबाची..

कुडाळ/-

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात राष्ट्रवादीचे माजी कार्याध्यक्ष प्रसाद रेगे यांनी शुक्रवारी रात्री कुडाळ येथील मुंबई-गोवा महामार्गावर टायर जाळून महामार्ग रोको आंदोलन छेडले या अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी रेगे व पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या घरावर अज्ञातांनी केलेल्या हल्ल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात उमटू लागले आहेत. पवार यांच्या घरा वरच्या हल्ल्याच्या निषेधार्थ माजी कार्याध्यक्ष प्रसाद रेगे यांनी काळप नाका येथील मुंबई-गोवा हायवेवर शुक्रवारी रात्री अचानक टायर पेटवून महामार्ग रोको आंदोलन छेडले. अचानक घडलेल्या या आंदोलनामुळे मुंबई महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची लांबच लांब रांग लागली होती.
सदरच्या या आंदोलनाबाबत पोलिसांना तितकीशी माहिती नसल्याने पोलिसांची घटनास्थळी तारांबळ उडाली घटनास्थळी पोलिसांनी दाखल झाल्यानंतर प्रसाद रेगे व पोलिस यांच्यामध्ये चांगली शाब्दिक बाचाबाची झाली.
शरद पवार हे आमचे दैवत असून आमच्या दैवताच्या विरोधात कोणी घृणास्पद कृत्य केल्यास आम्ही शांत राहणार नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही तर अखंड महाराष्ट्रात आंदोलन छेडू असा इशारा यावेळी प्रसाद रेगे यांनी दिला.

अभिप्राय द्या..