सिंधुदुर्गनगरी /-


                              

जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून नव्याने एकही कोरोना बाधित रुग्ण सापडला नाही. तसेच एकमेव सक्रीय रुग्ण होता, तोही आज कोरोनामुक्त झाल्याने जिल्हा आज कोरोना मुक्त झाला. सिंधुदुर्ग जिल्हा वासियांनी जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत वेळोवेळी केलेल्या काटेकोर कोविड प्रतिबंधक नियमांच्या पालनामुळे आणि सहकार्यामुळे आज जिल्हा कोरोनामुक्त झाला असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.           

जिल्ह्यात मार्च २०२० मध्ये पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. तत्पूर्वीच जिल्ह्यामध्ये पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी कोरोनाचा जिल्ह्यात शिरकाव होऊ नये यासाठी काटकोरपणे पावले उचलली होती. रुग्ण आढळल्यास त्यावरील उपाययोजनांबाबत खबरदारी घेण्यासाठी कोविड सेंटर्सची तयारीही ठेवण्यात आली होती.

जिल्ह्यामध्ये कणकवली, सावंतवाडी, जिल्हा रुग्णालय ओरोस येथे ऑक्सिजन जनरेशन प्लांट, कुडाळ येथे रिफिलिंग प्लांट उभारण्यात आले होते. त्याचबरोबर कोविड काळजी केंद्रे, कोविड आरोग्य केंद्रे यांचीही उभारणी करण्यात आली होती. पालकमंत्री श्री. सामंत आणि जिल्हा प्रशासन यांनी केलेल्या आवाहनाला जिल्हा वासियांनीही सकारात्मक प्रतिसाद देत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन केले होते. त्यामुळेच आज जिल्हा कोरोनामुक्त झाला. आजपर्यंत एकूण 55 हजार 847 जणांची कोरोनावर मात केली आहे. कोविड लसीकरणामध्येही जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. गेल्या आठ दिवसांपासून एकही नव्याने रुग्ण सापडला नाही. शिवाय एकमेव सक्रीय असणारा रुग्णही मुक्त झाल्याने जिल्हा आज कोरोना मुक्त झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page