You are currently viewing एकमेकांवर आरोप करणार्‍या संजय राऊत आणि किरीट सोमय्यांची किती आहे संपत्ती? वाचा सविस्तर

एकमेकांवर आरोप करणार्‍या संजय राऊत आणि किरीट सोमय्यांची किती आहे संपत्ती? वाचा सविस्तर

मुंबई /-

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. आता संजय राऊत यांनीही किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपे केले आहेत.गेल्या काही दिवसांत आरोप प्रत्यारोपांची राळ उठत आहे. ईडीने काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांची मालमत्ताही जप्त केली आहे. परंतु या दोन्ही नेत्यांची नेमकी संपत्ती आहे तरी किती.

असोसिएट फॉर डेमोक्रेटिक या वेबसाईटर नेत्यांच्या संपत्ती आणि दाखल झालेल्या केसेसबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. किरीट सोमय्या हे भाजपचे माजी खासदार आहेत. २०१४ साली ईशान्य मुंबई या लोकसभा मतदरसंघातून सोमय्या यांचा विजय झाला होता. तर संजय राऊत हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. उमेदवारीज अर्ज भरण्यापूर्वी प्रत्येक उमेदवाराला आपल्या नावावर किती संपत्ती आहे आणि किती गुन्हे दाखल आहेत याची माहिती द्यावी लागते.

कोट्यधीश नेते

किरीट सोमय्या आणि खासदार संजय राऊत या दोघांच्या नावावर कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. त्यात घर, जमीन जुमला, गाड्या, दागिने आणि गुंतवणुकीचा समावेश आहे.

५ वर्षात किरीट सोमय्यांचे उत्पन्न दुप्पट

२००४ साली किरीट सोमय्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. तेव्हा सोमय्या यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे २ कोटी २५ लाख ९ हजार २४९ रुपयांची संपत्ती होती. २००९ साली जेव्हा त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले तेव्हा त्यांची संपत्ती जवळपास दुप्पट झाली होती. तेव्हा सोमय्या यांच्याकडे ४ कोटी ७८ लाख ८१ हजार २६९ रुपयांची मालमत्ता होती. २००९ साली राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय पाटील यांच्याविरोधात त्यांचा पराभव झाला. २०१४ साली दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ७ कोटी २१ लाख ५६ हजार २५८ रुपयांची संपत्ती होती. तर सोमय्या यांच्यावर ६५ लाख ९२ हजार ८२६ रुपयांचे कर्ज होते. किरीट सोमय्या यांच्याकडे दीड कोटी रुपयांची स्थावर तर साडे पाच कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

संजय राऊत यांची संपत्ती

२००४ साली संजय राऊत पहिल्यांदा राज्यसभेचे खासदार झाले. आधी संजय राऊत यांची संपत्ती ४८ लाख ९४ हजार १६७ रुपये इतकी होती. २०१६ साली संजय राऊत पुन्हा राज्यसभेसाठी खासदार झाले तेव्हा त्यांची संपत्ती १ कोटी ५१ लाख १६ हजार २२८ रुपये इतकी होती.तर संजय राऊत यांच्यावर १४ केसेस दाखल आहेत.संजय राऊत यांच्या नावावर ३२ लाख २७ हजार २८९ रुपये इतकी जंगम मालमत्ता आहे. तर १ कोटी १८ लाख ७६ हजार ३१६ इतकी स्थावर मालमत्ता आहे.

अभिप्राय द्या..