You are currently viewing आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उदघाटन.;नेत्ररोग तज्ञ डॉ. तात्याराव लहाने व आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उदघाटन.;नेत्ररोग तज्ञ डॉ. तात्याराव लहाने व आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

ओरोस /-

उद्यापासून शासकीय मेडिकल कॉलेज ओरोस येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त २६ मार्च २०२२ पासून सुरु झालेल्या भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात विविध केंद्रांवर हजारो नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये सुमारे ४५० जणांना मोतिबंदुचे निदान झाले आहे. त्यांच्यावर ८, ९ व १० एप्रिल २०२२ रोजी सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज ओरोस येथे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह जे. जे. हॉस्पिटल मुंबईच्या नेत्र शल्य चिकित्सा विभाग प्रमुख डॉ. राघिनी पारेख यांच्यासह इतर १५ तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे. डॉ. तात्याराव लहाने व इतर जे.जे.रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉक्टर ओरोस येथे दाखल झाले आहेत. आज सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज ओरोस येथे डॉ. तात्याराव लहाने व आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उदघाटन करण्यात आले. मोतीबिंदू शस्त्रक्रिया केले जाणारे रुग्ण ओरोस येथे दाखल झाले असून रुग्नांची वैद्यकीय तपासणी सुरु करण्यात आली आहे. तर उद्यापासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे. याप्रसंगी डॉ लहाने व इतर डॉकटरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. डॉ लहाने यांनी आमदार वैभव नाईक यांच्या नियोजनाबद्दल गौरवोद्गार काढले. आ.वैभव नाईक यांनीही त्यांचे आभार मानले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील,डॉ गावकर, शिवसेना नेते सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जि. प सदस्य नागेंद्र परब, कुडाळ संपर्कप्रमुख बाळा म्हाडगूत,महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, राजन नाईक, बबन बोभाटे, जयभारत पालव,मंदार शिरसाट,मंदार केणी, महेश जावकर, सचिन काळप,उदय मांजरेकर, राजू गवंडे, श्रेया गवंडे, श्रुती वर्दम, ज्योती जळवी, नागेश ओरोसकर, छोटू पारकर, अवधूत मालवणकर सचिन कदम, अनुप नाईक, बाळा कोरगावकर, राजेंद्र घाडीगावकर, छोटू सावजी, राजेश गावकर, संदीप हडकर, विजय पालव, कृष्णा पाटकर, बाळू पालव, रवींद्र कदम, संतोष परब आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..