You are currently viewing जिल्हा बँकेच्या दुग्धविकास योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.; व्हिक्टर डान्टस

जिल्हा बँकेच्या दुग्धविकास योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.; व्हिक्टर डान्टस

मालवण /-

आधुनिक पध्दतीचा अवलंब करावा. दूध उत्पादनाबरोबरच जिल्ह्यातच अधिक मागणी असलेल्या दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीवरही शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या सर्व उद्योगांच्या उभारणीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य करण्यास सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक सदैव तत्पर आहे.” असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक संचालक व्हिक्टर डान्टस यांनी पेंडूर येथे श्री वेताळ दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्या. पेंडूर च्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना केले.
मालवण तालुक्यातील पेंडूर गावातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी काही शेतकऱ्यांनी एकत्र येत श्री वेताळ दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्या. पेंडूर ची स्थापना केली. या संस्थेचा तसेच संस्थेच्या दुध संकलन केंद्राचा उद्घाटन सोहळा सुरेश रा. परब यांच्या अध्यक्षतेखाली आणि सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक संचालक  व्हिक्टर डान्टस यांच्या हस्ते सोमवार दिनांक ४ एप्रिल रोजी संपन्न झाला. यावेळी माजी शिक्षण संस्था अध्यक्ष बाबाराव राणे, कॉंग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर , माजी वित्त बांधकाम सभापती संतोष साटविलकर , कॉंग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष महेश अंधारी, पेंडूर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष विनायक सावंत , सहाय्यक निबंधक . धुळप, सरपंच सुनिता मोरजकर ,सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच साबाजी सावंत , गोकुळ दुध संघाचे डॉ. राजेश गावकर, डॉ. रेडकर , पोलीस पाटील विश्वास मालवणकर , पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. तेली, मार्गदर्शक डॉ. सावंत , सत्यवान सावंत , गिरीश गावडे, विष्णू पेंडूरकर ( बाबा ) , आतिक शेख ,नितीन राऊळ , मनोज राऊळ, सुभाष सावंत.
श्री वेताळ दुग्ध उत्पादक संस्थेचे अध्यक्ष प्रदीप सावंत , उपाध्यक्ष दाजी सावंत , सचिव सतिश कांबळी आणि सर्व संचालक आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रविण सावंत यांनी केले तर आभार प्रदीप सावंत यांनी मानले.

अभिप्राय द्या..