You are currently viewing प्रफुल्ल सुद्रीक यांची सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या कार्यकारी समितीवर सदस्यपदी निवड.

प्रफुल्ल सुद्रीक यांची सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या कार्यकारी समितीवर सदस्यपदी निवड.

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पारंपारिक व्यवसायाला बळ देऊन शाश्वत विकासाला चालना देणाऱ्या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी सिंधुरत्न समृद्धी योजनेच्या कार्यकारी समिती सदस्य पदी विशेष निमंत्रित म्हणून शेखर निकम आणि सिंधुदुर्ग युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुरेश सुद्रीक यांची राज्य शासनाने निवड केली आहे. या निवडीबाबतचा शासन निर्णय 4 एप्रिल रोजी महाराष्ट्र शासनाचे उपसचिव सं. ह. धुरी यांनी निर्गमित केला आहे. सिंधुरत्न योजनेसाठी तब्बल 300 कोटींचा निधी राज्य शासनाने दिला असून यातून दरवर्षी 100 कोटींचा निधी पारंपरिक व्यवसाय व तत्सम व्यवसायाला आर्थिक बळकटी देण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शाश्वत विकासाला गतिमान करणाऱ्या सिंधुरत्न योजनेच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड झाल्याबद्दल प्रफुल्ल सुद्रीक यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. माझ्या निवडीचा फायदा जिल्ह्यातील गरजू आणि होतकरू युवा उद्योजकांना करून देणार आहे. युवा वर्ग आणि महिलांच्या हाताला शाश्वत रोजगार सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सुद्रीक यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..