You are currently viewing कणकवली येथील संतोष परब हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी अनिल नक्का याची जामिनावर मुक्तता.

कणकवली येथील संतोष परब हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी अनिल नक्का याची जामिनावर मुक्तता.


कणकवली /-

फिर्यादी संतोष परब यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कणकवली पोलीस स्टेशन गु.र.नं. ३८७/२०२१ भा.द.वि कलम ३०७ सह ३४ अन्वये दाखल करण्यात आला. सदर संशयित आरोपी क्र.९ अनिल नक्का याने जामिनासाठी ओरोस येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे कोर्टात अर्ज दाखल केला होता. सदर अर्जावर ओरोस येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र.२ गौरी कवडीकर यांनी आज रोजी रक्कम रुपये ३०,०००/- च्या सशर्त जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. आरोपीच्या वतीने अँड. श्री.राजेंद्र व्ही.रावराणे, अँड.कु.प्राजक्ता शिंदे यांनी काम पाहिले.

याबाबतची थोडक्यात हकीकत अशी की,
दिनांक १८/१२/२०२१ रोजी सकाळी ११ चे सुमारास कणकवली नरडवे रस्त्यावर शीतल चायनिज सेंटर जवळ नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने फिर्यादी संतोष मनोहर परब राहा. करंजे गावठणवाडी यांच्या मोटरसायकलला पाठीमागून येवून धडक दिली.त्यामुळे सदर संतोष परब हे रस्त्यावर पडले असता इनोव्हा कारमधील एक अनोळखी व्यक्ती खाली उतरली व त्याने तु सतिश सावंतचे काम करतोय का, बघतो तुला. असे म्हणून फिर्यादी यांचे छातीवर उजवे बाजूस वार केला व त्यामुळे फिर्यादी संतोष परब हे जखमी झाले. त्यावेळी सदर गोट्या सावंत आणि नितेश राणे यांना कळवायला पाहिजे असे म्हणून त्यांनी खिशातील फोन काढून तो कोणाला तरी लावू लागला व त्यानंतर इनोव्हामध्ये बसून कनेडीच्या दिशेने पळून गेला. सदर फिर्यादीवरून त्याच दिवशी चेतन यशवंत पवार, करण बाळासाहेब कांबळे, अनिल शंकर नक्का व करण दत्तू कांबळे यांना सदर गुन्ह्याचे कामी रात्री ९.४७ वाजता अटक करण्यात आली. सदर आरोपींना मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कणकवली यांचेसमोर दिनांक १९/१२/२०२१ रोजी हजर केले असता त्यांना दिनांक २१/१२/२०२१ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. तद्नंतर दिनांक २३/१२/२०२१ रोजी संशयित आरोपी क्र. ९ अनिल नक्का राहा- सी/५७ बीडी कामगार वसाहत, गणेश नगर,पुणे शहर, जिल्हा-पुणे , याला मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कणकवली यांचे कोर्टात हजर केले असता त्याला आणखीन दोन दिवसांची दिनांक २५/१२/२०२१ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. तद्नंतर २५/१२/२०२१ रोजी संशयित आरोपी क्र. ९ याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती.
अनिल शंकर नक्का राहा-पुणे यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर आदेश करून आज दिनांक ०१/०४/२०२२ रोजी ओरोस येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र.२ गौरी कवडीकर यांनी रक्कम रुपये ३०,०००/- च्या सशर्त जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.

अभिप्राय द्या..