You are currently viewing फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच वेंगुर्ले च्या अध्यक्षपदी जयप्रकाश चमणकर यांची निवड

फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच वेंगुर्ले च्या अध्यक्षपदी जयप्रकाश चमणकर यांची निवड


    वेंगुर्ला /-

फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच वेंगुर्लेच्या अध्यक्षपदी वेंगुर्ले पंचायत समितीचे माजी सभापती व सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश चमणकर यांची तर सचिव पदी वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष के. जी. गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच वेंगुर्लेच्या कार्यकारिणीची पुर्नरचना करण्यासाठी येथील साई डिलक्स हॉल येथे जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. यावेळी १९ जणांची कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली.या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी जयप्रकाश चमणकर, उपाध्यक्षपदी एन. पी. मठकर, प्रा. सुनिल भिसे, सचिवपदी के. जी. गावडे, सहसचिव लाडू जाधव, खजिनदार जयंत जाधव, महिला विभागप्रमुख विमल राजकुमार शिंगाडे, सदस्य म्हणून रिबेका अमोल श्रीसुंदर, प्रा. व्ही. पी. नंदगिरीकर, शामसुंदर राय, उदय भगत, प्रदिप सावंत, समिर भगत, आनंद आमरे, राजकुमार शिंगाडे, आग्नेल सोज, सखाराम जाधव, विठ्ठल जाधव, वाय. जी. कदम इत्यादींची कार्यकारिणी निवडण्यात आली. तसेच हा फुले, शाहू आंबेडकर विचार मंच रजिस्टर करण्याचे ठरले.यावेळी जयप्रकाश चमणकर, एन. पी. मठकर, प्रा. सुनिल भिसे, के. जी. गावडे, प्रदिप सावंत, विमल शिंगाडे, रिबेका श्रीसुंदर, प्रा. नंदगिरीकर, राजकुमार शिंगाडे, वाय. जी. जाधव यांनी विचार मांडले. प्रास्तविक प्रा. भिसे व लाडू जाधव यांनी आभार मानले.

अभिप्राय द्या..