You are currently viewing नेमळे येथील चार वर्षीय चिमुरड्या “विघ्नेश” ने केला गिरनार पर्वत सर.;चक्कर येऊन सुद्धा थांबला नाही प्रवास;आई वडीलांसह पाच तासात केले अंतर पार…

नेमळे येथील चार वर्षीय चिमुरड्या “विघ्नेश” ने केला गिरनार पर्वत सर.;चक्कर येऊन सुद्धा थांबला नाही प्रवास;आई वडीलांसह पाच तासात केले अंतर पार…

सावंतवाडी /

नेमळे येथील अवघ्या सव्वा चार वर्षीय “विघ्नेश” या चिमुरड्याने गिरनार पर्वत सर केला आहे. त्या ठिकाणी तब्बल दहा हजार पायऱ्या चढून त्यांने दर्शन घेतले आहे. आपले वडील वैभव व आई श्रेया यांच्यासमवेत त्यांनी हा प्रवास केला. त्यापूर्वी कोकणातील एका मुलाने हा प्रवास केला होता. या सर्व पायऱ्या चढून विघ्नेशने पाच तासात हा प्रवास पूर्ण केला. विशेष म्हणजे चक्कर येऊन सुद्धा विघ्नेशने आपला प्रवास थांबवला नाही.
काल रात्री त्यांनी प्रवासाला सुरुवात केली होती. त्याच्या सोबत अन्य आठ जण होते. या ठिकाणी अन्य लोक आपल्या मुलांना दर्शनासाठी घेऊन येताना डोली अथवा पाठीवर घेऊन जातात. परंतु विघ्नेशने हे अंतर स्वतः पायी चालत पार केले आहे. त्या विषयी माहिती त्याचे वडील वैभव घोगळे यांनी दिली. श्री. घोगळे हे नेमळे येथील रहिवासी आहेत. अन्नपूर्णा केटरर्स आणि व्हेज मंचुरियन ,असा त्यांचा व्यवसाय आहे. मुलाने गिरनार पर्वत सर केल्याचा आपल्याला अभिमान आहे, असे त्यांनी सागितले. तो कुडाळ येथील सुशीला शिशुवाटीकेचा विद्यार्थी आहे.

अभिप्राय द्या..